HW News Marathi
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

छत्तीसगढ | विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सोमवारी सकाळी सुरुवात झाली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर छत्तीसगढ विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. हे सर्व मतदारसंघ आठ नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आहेत. छत्तीसगढमधील जनतेने घराबाहेर पडून मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावण्याला आहे.

मतदानाला २४ तास शिल्लक असताना नक्षलवाद्यांनी एका पाठोपाठ एक सहा आयईडीचे स्फोट घडवले होते. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. तर मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडी देखील पहायला मिळाल्या आहेत. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष घनराम साहू यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने छत्तीसगढमध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १८ जागांसाठी ६५० मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. नक्षली हल्ल्याच्या शक्यतेने अनेक ठिकाणी हेलिकॉप्टने अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. गेल्या १० दिवसात या भागातून ३०० आयईडी सापडले आहेत. मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी एक लाख जवान तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी बिजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर, कोंटा येथील नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

News Desk

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

News Desk

धैर्यशील मानेंच्या घराजवळ आंदोलन करणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

Aprna