HW News Marathi
राजकारण

दिवाळीनिमित्त मुंबईत किल्ले बांधणीला उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई | दिवाळीची चाहूल लागताच लहानग्यांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्व जण अनेक जण फटाके फोडण्याचे फराळावर ताव मारण्याची त्यासोबत किल्ले बांधण्याचे वेध लागते. दिवाळी निमित्ताने किल्ले बांधण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. दिवाळी किल्ले बांधण्याची परंपरा आजही जीवत आहे. मुंबई उपनगरात ठिकठिकाणी किल्ले बांधण्यात आले आहे.

दिवाळी म्हणजेच आनंद मांगल्याचा आणि रोषणाईचा सण परंतु या सोबतच आपली प्राचीन परंपरा प्राचीन इतिहास जपण्याचा प्रयत्न देखील या सणाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. खरे तर दिवाळीच्या काळात ज्या सुट्ट्या पडतात त्या वेळेला लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवायचे आणि सुट्टीत फावल्या वेळेत ही मुले एकत्र जमून किल्ले बनवताना ठीक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या महाराष्ट्राची शहान असलेले जंजिरा, शिवनेरी, राजगड आदी किल्ले बच्चेकंपनी सकारतात.

पूर्व उपनगरात ही दिवाळीत बच्चेकंपनी किल्ले बांधणी मोठ्या प्रमाणात करताना दिसत. घाटकोपर मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी या भागात मोठ्या प्रमाणात किल्ले बनविण्यात आले आहेत. घाटकोपर येथे प्रतापगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती यावेळी तयार करण्यात आली आहे. लहान मुलांना किल्ले बांधण्याच्या माध्यमातून त्यांचे महत्त्व समजते.

घाटकोपर मधील पारशीवाडी विभागात असलेल्या बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहजवळ लहान मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून बनिवलेला प्रतापगड हा सध्या कौतुकाचा चर्चेचा विष ठरत आहे. हा किल्ला सहा फूट रुंद आणि दोन फूट उंच असा हा प्रताप गड प्लास्टिकच्या बॉटल पासून तोफ, बॉक्सच्या पुठ्ठयांपासून गडाचे दरवाजे सिमेंटचे तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि विटांपासून गडाची तटबंदी लहानग्यांनी तयार केला आहे. त्याच विभागात काही अंतरावर पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व बाल कलाकारांनी अहोरात्र मेहनत करून आपल्या वाडीत अतिशय कल्पक आणि उत्कृष्ट असा सिंधुदुर्ग किल्ला साकारला आहे. हा किल्ला बनवण्यासाठी त्यांना २ आठवडे लागले. हा किल्ला हुबेहूब सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा दिसतो. १२ ते १७ या वयोगटातील मुलांनी हा किल्ला तयार केला आहे. आजूबाजूला समुद्र तयार करून त्यात मासे सोडण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी किल्ले पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना ते हा इतिहास सांगतात. त्यामुळे हा टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला किल्ला पाहून घाटकोपर मधील नागरिक या लहान मुलांचे कौतुक करीत आहेत.

मुलुंड म्हाडा काँलनी येथे देखील किल्ले बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येक भागात किल्ले दिसून येतात. लहान मुलेही उत्साहाने काम करताना दिसून येतात. येथे भव्य किल्ले बनवण्यात आले आहेत. या भागातील रिचा टॉवर येथे सिंहगडाची प्रतिकृती तयार करण्यात आली. उंचीला अडीच फूट आणि २० रुंदी आहे. किल्ले हे महाराजांचे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. यामुळे प्रत्येकांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीला या किल्ला बांधणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगता येतात. या भागातच औरंगाबाद येथील दौलताबाद किल्ल्याची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. इमारतीच्या अंगणात १७ फूट लांबीला आणि १२ फूट रुंदीचा भव्य किल्ला तयार केला आहे. किल्ला बांधणीमुळे आम्हाला महाराष्ट्रतील किल्ल्याचा अभ्यास करायला मिळतो. गेल्या ८ वर्षांपासून आम्ही हे किल्ले बनवत आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजा का बेटा म्हणून राजा होणार नाही”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna

मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जाच्या आधारे अनिल देशमुख यांनी CBI न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

Aprna

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी जमीन हस्तांतरित करा !

Gauri Tilekar