नवी दिल्ली । चीनमधील एका वृत्तसंस्थेने चक्क बातम्या सांगणारा रोबो तयार केला आहे. तो रोबो हुबेहुब माणसासारखा दिसतो आणि तो तसाच बोलतो सुद्धा आहे. त्या रोबोच्या चेहऱ्यावरील हावभाव हे पाहिले की तो रोबो आहे की मनुष्य हेच कळतच नाही. इंग्रजी भाषेत बातम्या सांगणाऱ्या रोबोचे नाव झँग झाओ आहे. चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने आर्टिफिशिअल इंटलिजन्स असणाऱ्या अँकर रोबोचे टीव्हीवर पदार्पण केले आहे.
&
Xinhua’s first English #AI anchor makes debut at the World Internet Conference that opens in Wuzhen, China Wednesday pic.twitter.com/HOkWnnfHdW
— China Xinhua News (@XHNews) November 7, 2018
nbsp;
झिनुआ न्यूज एजन्सी आणि चीनमधील सर्व इंजिन सोगोऊ डॉट कॉम यांनी संयुक्तरित्या या रोबो अँकरची निर्मिती केली आहे. “तो रोबो रिपोर्टिंग टीमचा सदस्य झाला आहे. तसेच तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २४ तास कार्यरत असेल. शिवाय बातम्यांची प्रॉडक्शन कॉस्ट करुन कार्यक्षमतेत सुधारणा होईल,”असे झिनुआचे म्हणणे आहे. या आधीही झिनुआ वृत्तसंस्थेने अँकर रोबो तयार केला होता. पण त्याचा लूक बरा नसल्याने त्यांनी पुन्हा नव्याने हा रोबो बनवला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.