HW News Marathi
राजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

सांगली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ११ नोव्हेंबरला सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आज (बुधवार) सांगलीत दिला आहे. या आंदोलनाच्या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून सर्वच गावांमध्ये पूर्ण बंद पाळण्यात येणार असून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यंदाच्या ऊस हंगामात अजूनपर्यंत कोणताही उपाय निघालेला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी आता परस्परच हंगाम सुरू करण्याचे ठरविले आहे. कोणताही उपाय न काढता हंगाम सुरू करण्याचा परस्पर प्रयत्न हाणून पाडू, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. आता पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्याचप्रमाणे जर कारखाने सुरु झाले तर एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘ब्लास्ट’

News Desk
राजकारण

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

News Desk

पुणे | संभाजी ब्रिगेडने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक लढा तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा याबाबत पुढाकार घेतला आहे. ग्रामपातळीवर याविषयी प्रबोधन केले आहे. तसेच जनसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेतले आहेत. जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, संभाजी ब्रिगेड येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी दिली.

चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावाप्रसंगी मार्गदर्शन करताना सुधीर देशमुख बोलत होते. जनसामान्यांच्या प्रश्‍नाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनेक अडचणी जाणवल्या आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने स्वतः राजकारणात येऊन लोकांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

News Desk

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk