HW News Marathi
राजकारण

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

बेंगळुरु | कर्नाटकातील पोटनिवडणुकीतून जनतेचा कौल आज स्पष्ट झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तीन लोकसभा आणि दोन विधानसभा जागांपैकी चार जागांवर काँग्रेस- जेडी(एस) युतीने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ शिमोगा लोकसभेची एकच जागा मिळवता आली आहे. तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन जागांवर मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मानसपुत्र आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी दारुन पराभव झाला. भाजपचे जनार्दन रेड्डी यांचा बळ्ळारी हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपच्या जे शांता यांच्यावर तब्बल २४३१६१ मतांनी विजय मिळविला आहे

तर मंड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार एल आर शिवरामोगौडा यांनी भाजपच्या डॉ. सिद्धरामय्या यांचा ३,२४,९४३ मतांनी धुव्वा उडविला.भाजपने शिमोगा लोकसभा मतदारसंघातून येडीयुराप्पाचे पुत्र राघवेंद्र ५२१४८ मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वाामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे एल. चंद्रशेखर १०९१३७ मतांनी दारुन पराभव केला आहे. जेडीएसला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणुका

News Desk

अमित शहांच्या प्रकृतीत सुधार, एक-दोन दिवसांत मिळणार डिस्चार्ज !

News Desk