HW News Marathi
देश / विदेश

महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र

कोटयम्म सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला येथील अयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला केला होता. त्यानंतर आता अय्यप्पा मंदिराचे सोमवारपासून पुढे दोन दिवस विशेष पूजेसाठी दुसऱ्यांदा दार उघडले जाणार आहे. परंतु गेल्या वेळी झालेल्या घटना पुन्हा नको म्हणून,”वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना शबरीमाला मंदिरामध्ये पाठवू नका”, असे विरोध करण्याऱ्या संघटनांनी प्रसिद्धीमाध्यमांना कळविले आहे.

पुन्हा एकदा दोन दिवसांसाठी मंदिर उघडले जाणार आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद व हिंदू ऐक्यवेदी यासारख्या संघटनांची संयुक्त आघाडी असलेल्या शबरीमाला कर्म या समितीने संपादकांना पत्र पाठविले. “१० ते ५० या वयोगटातील महिला पत्रकार मंदिर परिसरात आल्या,तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे”. असे त्यात म्हटले आहे.

शबरीमाला मंदिरातील १० ते ५० या वयोगटातील महिलांची प्रवेशबंदी न्यायालयाने रद्द केली आहे. तरी ऑक्टोबर महिन्यात मंदिर पाच दिवसांसाठी उघडले तेव्हा आंदोलकांनी एकाही महिलेला मंदिरापर्यंत जाऊ दिले नव्हते. महिला पत्रकारांनाही हुल्लडबाजी करून परत पाठविण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले, ६ जणांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी

News Desk

मोदी मंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर

News Desk

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवाही ३ मेनंतर सुरू होणार

News Desk