मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत. या दोन ब्रिटिशकालीन तोफा शनिवारी (३ नोव्हेंबर)ला राजभवनातील जमिनीखाली सापडल्या आहेत. या महाकाय तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या असून यांचे वजन २२ टन आहे.
Maharashtra: Two identical British era cannons weighing 22 tonnes each found in Raj Bhavan in Mumbai earlier today. Maharashtra Governor Chennamaneni Vidyasagar Rao was present at the cannon lifting operation and ordered conservation & restoration of the cannons. pic.twitter.com/lG4YwZLvVL
— ANI (@ANI) November 3, 2018
राज्यपाल विद्यासागर राव यांनी या तोफा जमिनीतून बाहेर काढण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच या तोफांबाबत अधिक माहिती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्हेी. सध्या या तोफा राजभवनातील आवारात ठेवण्यात आल्या आहेत. याआधी राजभवनामध्ये २०१६ रोजी एक ब्रिटिशकालीन बंकर आढळला होता.
या दोन्ही तोफाचे प्रत्येकी वजन २२ टन असून लांबी ४.७ मीटर अधिकतम व्यास १.५ मीटर इतका आहे. दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने ५० मीटर उंचवर उचलण्यात आल्या होत्या. यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या. या तोफा अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.