HW News Marathi
राजकारण

उमेदवारांवर पाच गुन्हे असले तरी तो जिंकणार हवा !

भोपाळ | मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि छिंदवाडामधून खासदार असलेल्या कमलनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या मध्य प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या व्हिडीओमुळे मध्य प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले चित्र दिसत आहे. या व्हिडीओ भाजपच्या मध्य प्रदेश ट्विटर अकाउंटमध्ये शेअर केला आहे. “उमेदवारावर एक किंवा पाच गुन्हा असो, त्याच्यावर कितीही गुन्हे दाखल असेल तरी काही फरक पडत नाही, पण आपल्याला उमेदवार जिंकणाराच हवाय,” असे वादग्रस्त विधान कमलनाथ यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे.

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “ही जर काँग्रेसची रणनिती आहे, तर जनता समजूदार आहे. जनता २८ नोव्हेंबरला मतदान करून कोणाला विजयी करेल ते,” चौहान यांनी म्हटले आहे. चौहान यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी शनिवारी (३ नोव्हेंबर)ला काँग्रेसमध्ये प्रवेश करून चौहान यांना मोठा धक्का दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पूरग्रस्तांना नवीन घरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची घोषणा

News Desk

अनिकेत तटकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

swarit

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna
देश / विदेश

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

श्रीनगर | पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून भारतीय लष्कराचे कॅम्प आणि राजधानी दिल्लीवर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

काश्मीरमधील लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी गस्ती पथके, पोलीस, सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

तसेच राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दहशवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाणी हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकमधून घुसखोरी करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबा दोन्ही संघटनांपैकी नक्की कोणत्या संघटनांचा हात असण्याची माहिती अद्याप गुप्तचर संघटनांना मिळाली नाही.

Related posts

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

News Desk

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

News Desk