HW News Marathi
देश / विदेश

#MeToo : मला भीती दाखवून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले !

नवी दिल्ली | ‘मला भीती दाखवून माझा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांनी माझ्याशी संबंध प्रस्थापित केले’, असे पल्लवी यांनी स्पष्ट केले आहे. पल्लवी गोगोई या त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. अमेरिकेहून भारतीय महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एम. जे. अकबर यांनी सहमतीने संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगितले होते.

एम. जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याचमुळे त्यांना विरोधकांच्या दबावामुळे आपल्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. मात्र, आपण याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.

२३ वर्षांपूर्वी भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई या एशियन एजमध्ये काम करत होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. या काळात एम. जे. अकबर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पल्लवी यांनी केला आहे. १९९४ सालच्या दरम्यान हे सर्व घडलेले असून पल्लवी यांनी त्यावेळी याबाबत पोलिसांकडे तक्रार न केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत जिल्हा सोडण्याचे आदेश

News Desk

EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

News Desk

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

News Desk