HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेले अनेक दिवस घट होत आहे.आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात १९ पैशांनी तर डिझेलच्या दरात १२ पैशांनी दर घट झाली आहे. तर मुबईकरांना पेट्रोलसाठी ८४.४९ रुपये, तर डिझेलसाठी ७७.०६ रुपये मोजावे लागणार आहे.

राजधानी दिल्ली पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले असून, राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७८.९९ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७३. ५३ रुपये मोजावे लागणार आहेत.देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे.

मात्र काहीच दिवसांआधी देशात दर दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत असल्याचे त्यावेळी सरकारकडून सांगण्यात येत होते.मध्यंतरीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सरकार बेरोजगारांच्या खात्यात जमा करणार पैसे

Gauri Tilekar

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

मुख्यंमंत्र्यांची कुटुंबासमवेत अयोध्या वारी !

swarit