HW News Marathi
देश / विदेश

या मराठमोळ्या शिल्पकाराने घडविले स्टॅच्यू ऑफ युनिटी

नवी दिल्ली | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचे अनावरण झाले आहे. परंतु स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणी साकारला तुम्हाला माहिती आहे का ? हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. राम यांचे वय ९३ वर्षे आहे. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच असा पुतळा साकारला आहे. या मराठमोळ्या कलाकाराला गुरुवारी ‘टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राम यांचा नोएडामध्ये स्टुडिओ असून यांना त्यांच्या वडिलांकडूनच कलाकुसरीच्या वस्तू साकारण्याचे कौशल्य मिळाले आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची गुरू श्रीरामकृष्ण जोशी यांच्याशी भेट झाली.

राम य़ांचे वय ९३ वर्षे आहे. पण अजूनही ते हात सुरेख शिल्प साकारण्यात गुंतलेले आहेत. त्यांचे लहानपण हलाखीत गेले असले तरीही, त्यांच्या हातात सरस्वतीचा वास होता. त्यांनी साकारलेले पुतळे देशातच नव्हे, तर जगभरात मोठ्या मानसन्मानाने बसविले गेले. गुजरातमधील सरदार सरोवर येथे साकारण्यात आलेला ५५0 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू आहे. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा मुलगा अनिल, नातू समीर व नात सोनाली हे चालवित आहेत. मूळचे धुळ्याचे असलेले शिल्पकार राम सुतार यांचे वडील वनजी लाकडी वस्तू व कृषी अवजारे बनवायचे.

राम सुतार यांचे कार्य

राम सुतार यांनी पहिला पुतळा १९४७ साली एका बॉडी बिल्डरचा बनवला होता. स्वतःच्या शाळेसाठी १९४८ साली महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला होता. तेथून त्यांचा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला. जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचविले. शिवाय त्यांची राहण्याची व उदरनिर्वाहाची सोयही करून दिली. त्यांनी अनेक सुवर्णपदकेही मिळविली आहेत.

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने रशिया, मलेशिया, इंग्लंड अशा विविध देशांना महात्मा गांधीजींचा पुतळा भेट दिला. गांधीजींचे भारतासह जगभरात बसविलेले जवळपास ३५० पुतळे राम सुतार यांनी साकारले आहेत. दिल्ली विमानतळावर बसविण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तसेच सरदार वल्लभभार्इंचा सरदार सरोवर येथे साकारण्यात येणारा ८५ फूट बेस व ५२२ फूट उंचीचा सर्वांत मोठा पुतळा बनविण्याचे काम सुतार यांच्याकडेच आहे. अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे. राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा-नांगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास त्यांना सांगितले. मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा दिगग्ज व्यक्तींचे १६ पुतळे बनवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने घेतला महाराष्ट्रातील बांधकाम बंदी उठवण्याचा निर्णय

News Desk

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२२ वर

News Desk

शशी थरुर यांनी दिले डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर

News Desk