मुंबई | ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या ब्रीदवाक्याला पूर्णपणे न्याय देऊ पाहणारी ‘सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट’ ही संस्था यंदा ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना राबवत आहे. ‘सक्षम भारत’ या उपक्रमाअंतर्गत ही संकल्पना राबविण्यात येणार असून गेल्या काही वर्षांपासून पुणे, कोल्हापुर, नागपूर, अकोला, जालना आणि मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘माणुसकीची भिंत’हा उपक्रम राबविण्यात आला होता. माणुसकीच्या तत्वाला आधार देणारी ही ‘माणुसकीची भिंत’ दिनांक, २५ ऑक्टोबर बुधवार ते २८ ऑक्टोबर रविवार पर्यंत असणार आहे. ही भिंत रहेजा टॉवरच्या बाजूला, नेरलॉक पेंटच्या समोर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (प) मुंबई या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
‘गरजवंतांमधील दुवा होऊन निस्वार्थी भावनेने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी’ हा एकमेव उद्देश समोर ‘सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट’ या संकल्पनेला हातभार लावत आहेत.. आपल्याजवळ असलेल्या अनावश्यक वस्तू गरजवंतांच्या उपयोगी याव्यात याकरीता ही भिंत उभारण्यात आली आहे. मदत करण्याची इच्छा असलेली प्रत्येक व्यक्ती सढळ हाताने या गरजूंना मदत पुरवू शकते. फक्त कपडेच नव्हे तर वापरण्याजोगी खेळणी सुद्धा दान करता येणार आहेत.
”या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, दुर्बल घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असून मुंबईकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ” असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ‘पुंडलिक लोकरे’ यांनी केले आहे.
‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचे मुख्य आकर्षण
यंदा फक्त कपडेच गरजवंतांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश नसून दान म्हणून आलेल्या वस्तूंवर योग्य ती प्रक्रिया करुन ते त्या वस्तू वापरण्यायोग्य बनवून गरीब गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संस्था पूर्णपणे घेणार आहे.
यंदा दान करता येण्यासारख्या गोष्टी आणि त्यामागील उद्देश :
कपडे : आपण सर्व प्रकारचे लहान, मोठयांचे, स्त्री, पुरुषाचे कपडे, चादर, ब्लॅंकेट, इत्यादी दान करू शकता. ते कपडे धुवून, दुरुस्त करून , इस्त्री करून , पॅकिंग अशा प्रकारच्या त्यावर प्रक्रिया करून ते गरीब, गरजवंतांपर्यंत पोहचवले जातात.
सायकल : आपण दान केलेली सायकल रिपेअरिंग करून ती वापरण्या योग्य बनवून आदिवासी व खेडेगावातील विद्यार्थी ज्यांना दूरचा प्रवास करणे शक्य नसल्याने शाळा अर्ध्यावर सोडावी लागते अश्या विध्यार्थ्यांना देण्यात येतात.
खेळणी : आपण दान केलेली खेळणी गरीब, निराधार, बेवारस, दुर्धर आजाराने ग्रस्त अशा मुलांना देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न असतो. आपले सहकार्य कोणाच्या तरी आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करु शकतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.