HW News Marathi
राजकारण

स्टॉलच्या वादातून शिवसैनिकांनी केली उत्तर भारतीय तरुणाला मारहाण

मुंबई | शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणाला मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे. ही घटना प्रभादेवी विभागातील शिवसैनिकांनी विशाल पांडे या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत सेनेच्या प्रभादेवीतील शाखाप्रमुख शैलेश माळी आणि त्याचा मुलगा मंदार माळीही सहभागी होता. महत्त्वाची गोष्टी म्हणजे मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ही मारहण स्टॉल लावण्यावरून झाली आहे. विशालने सिद्धिविनायक मंदिराच्या मागे फ्रँकीचा स्टॉल लावला होता. परंतु दुसऱ्या दिवशीच काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल का लावला, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि त्याचा स्टॉल तोडला. स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांचे मन शांत झाले नाही, तर त्यांनी विशालला बांबूच्या काठीने मारहाण करत प्रभादेवीतील उर्वशी बिल्डिंगमध्ये विशालच्या घरात घुसून मारहाण करत होते. विशाला वाचवण्यासाठी पुढे आलेला त्यांचा भाऊ निखाल पांडे देखील मारहाण करण्यात आली.

यात विशाल पांडे आणि त्यांचा भाऊ निखील पांडे दोघेही जखमी झाले आहेत. विशालच्या बहीण प्रियंका हिने आम्ही उत्तर भारतयी असल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवसेना शाखाप्रमुख शैलेश माळी, त्याचा मुलगा मंदार माळी, शेखर भागवत, संतोष म्हात्रे, कैळाश पाटील, दीपक बोरकर या शिवसैनिकांना आपल्या भावाला मारहाण केली, असाही आरोप प्रियंकाने केला आहे. दादर पोलीस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk

शेतकऱ्याच्या घटलेल्या उत्पन्नाची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? 

News Desk

नेहरू, राजीव गांधींनंतर ‘तो’ करिश्मा नरेंद्र मोदींमध्ये !

News Desk