HW News Marathi
महाराष्ट्र

आज न्यायालयीन कामकाजावर राहणार बहिष्कार

पुणे| पुण्यातील येरवडा येथील अ‍ॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. सदर प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात पुणे शहर व जिल्ह्यातील वकील संघटना आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार आहेत. अ‍ॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर प्राणघात हल्ला झाल्याने देवानंद यांच्या भावाने येरवडा पोलिसठाण्यात फिर्याद केली आहे. देवानंद यांचे भाऊ भरत ढोकणे हे देखील फौजदारी तसेच कौटुंबिक खटल्यांचे कामकाज करतात. फौजदारी तसेच कौटुंबिक खटल्यांचे कामकाजावर बहिष्कार घालणार आहे.

अॅड. देवानंद ढोकणे हे सोमवारी रात्री काम संपवून कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते . रात्री पावणे नऊच्या सुमारास संगमवाडी येथे दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरुब पळून गेले. या गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र बराच रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

दिवाळीनंतरच महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

News Desk

“देशमुखांना जेलमध्ये टाकलंत, आज ना उद्या किंमत मोजावीच लागेल!”- शरद पवार

News Desk