HW News Marathi
मुंबई

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामास मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई | शिल्पांच्या माध्यमातून १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्याची ओळख, विविध भारतीय नृत्यशैलींवरील आकर्षक व माहितीपूर्ण शिल्प, संगीतमय कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी यासारख्या विविध बाबींचा समावेश असलेल्या ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ हे अल्पावधीतच नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु लागले आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरातील पूनम नगरमध्ये असलेल्या या शिल्पग्रामास २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिल्याने गर्दीचा उच्चांक नोंदविला गेला आहे. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शिल्पग्रामाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी रविवारसह प्रत्येक सुट्टीच्या दिवशी अधिक सुरक्षा व्यवस्था प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
जोगेश्वरी पूर्वतील वेरावली जलाशयाजवळ असणा-या ३ लाख ७० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ (८.५ एकर) असणा-या पालिकेच्या भूखंडावर शिल्पग्रामाचे आरक्षण होते. यानुसार गेल्या सुमारे ३ वर्षात करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण व नियमित प्रयत्नांमधून या भूखंडावर आकारास आलेल्या शिल्पग्रामाचे गेल्याच रविवारी लोकार्पण करण्यात आले होते. याठिकाणी विविध कलाकौशल्यांची ओळख करुन देणारी शिल्पं, संगीत कारंजे यासह वृक्ष, शोभेची झाडे, वेली देखील आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी झोके, घसरगुंडी, मेरि-गो-राऊंउ यासारखी विविध खेळणी देखील याठिकाणी आहेत संपूर्ण देशातील विविध कला या शिल्पांच्या माध्यमातून दाखविता याव्यात व नवीन पिढीला विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील कला व संस्कृतीची ओळख व्हावी, या प्रमुख उद्देशाने पालिकेद्वारे शिल्पग्रामाची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या गेलेल्या १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्यांवर आधारित माहितीपूर्ण शिल्पं देखील या शिल्पग्रामामध्ये आहेत. त्याचबरोबर विविध भारतीय नृत्य शैलींची ओळख करुन देणा-या शिल्पांचाही समावेश याठिकाणी आहे. यामध्ये प्रामुख्याने कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, भांगडा, गरबा यासह लावणीचाही समावेश आहे. मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ हे सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ या कालावधी दरम्यान सर्व नागरिकांसाठी खुले असते. तरी या शिल्पग्रामास अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी व याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकर्षक शिल्पांच्या माध्यमातून आपल्या पारंपारिक कलांची ओळख करुन घ्यावी, असेही जितेंद्र परदेशी यांनी आवर्जून नमूद केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

२०० विद्यार्थ्यांना ठाण्यातील फेक युनिव्हर्सिटीचा फटका, उकळले कोट्यावधी रुपये

News Desk

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंच्या भूमिकेवरून आज उडणार गोंधळ

News Desk