HW News Marathi
देश / विदेश

आता फटाके फक्त दोन तासच फोडा !

नवी दिल्ली | फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयाबाबात सर्वोच्‍च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली नाही. परंतु ऑनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात लावलेली आहे. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे दिवाळी आणि सणात मात्र रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्‍च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासाचाच अवधी देण्यात आला आहे.

तर नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. केवळ दिवाळीच नाही, तर प्रत्येक सण-उत्सवांसाठी हा नियम लागू असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जस्टिस एके. सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांनी २८ ऑगस्ट रोजी यावर निर्णय राखून ठेवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk

चिराग पासवान यांना धक्का, लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं!

News Desk

शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता !

News Desk