अमृतसर । रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्या लोकांना ६१हुन अधिक जणांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. या भीषण अपघातात ७२ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. यात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीचा अहवाल चार आठवड्यात सादर केला जाईल, अशीही माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिला आहे.
When a tragedy occurs the entire administration gets involved. We have come here as soon as we could come. Today, the entire cabinet of Punjab is here: Punjab CM Captain Amarinder Singh #AmritsarTrainAccident pic.twitter.com/1982Encpdo
— ANI (@ANI) October 20, 2018
तसेच, या अपघातातील पीडितांना मदत म्हणून राज्य सरकारने 3 कोटी रुपये दिले असल्याची अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.
#AmritsarTrainAccident: Punjab CM orders immediate release of Rs. 3 Cr to DC Amritsar for payment of ex-gratia to the families of the deceased. pic.twitter.com/PKU8HCgQ8p
— ANI (@ANI) October 20, 2018
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रेल्व घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश सामील आहे. तसेच दु:खाच्या प्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
Punjab Chief Minister Captain Amarinder Singh meets victims of #AmritsarTrainAccident at Guru Nanak Dev government hospital in Amritsar pic.twitter.com/bzlgusdwas
— ANI (@ANI) October 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.