HW News Marathi
मनोरंजन

दीपिका-रणवीरचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल

मुंबई | दीपिका आणि रणवीर यांची जोडी क्युटेस्ट जोडी म्हणून ओळखली जाते. प्रियंका चोप्राच्या लग्नाच्या चर्चेनंतर दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु आहे. काही दिवसांपासून दीपिका रणवीरच्या लग्नाच्या तारखेची चर्चा चालू होती. मात्र या चर्चाना आता पूर्णविराम लागणार आहे. कारण दीपिकाने खुद्द आपल्या ट्विटद्वारा आपल्या आणि रणवीरच्या लग्नाची तारीख घोषित केली आहे. २० नोव्‍हेंबरला लग्‍न होणार असे वृत्त होते पण दीपिकाने लग्न पत्रिका ट्विट करत लग्नाची खऱ्या तारखा तिने सांगितल्या आहेत.

दीपिकाच्या ट्विटनुसार येत्या १४ व १५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीर सिंग साता जन्माची गाठ बांधणार आहेत.लग्नाची तारीख स्पष्ट झाली असली तरी लग्नसोहळा कुठे पार पडणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हे कपल इटलीत डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

https://twitter.com/deepikapadukone/status/1053956519010725888

 

रामलीला सिनेमा दरम्यान रणवीर आणि दीपिका यांची मैत्री वाढली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नच्या चर्चा होत होत्या. मध्ये रणवीर आणि दीपिका मधील ब्रेकअपच्या चर्चा देखील सुरु होत्या. मात्र या ब्रेकअपच्या चर्चांवर आता दीपिकाने ट्विटद्वारा आपल्या लग्नाच्या तारखा जाहीर करून फुल्लस्टोप लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

News Desk

डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

swarit

आषाढ महिन्यातल्या दीपपूजेविषयी थोडक्यात… 

News Desk