HW News Marathi
राजकारण

लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला !

अहमदनगर | लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, सत्ता आहे म्हणून मी शेपू हलवणार नाही,” असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवार २१ ऑक्टोबर) अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघ पिंजून काढणार आहेत. याची सुरुवात आज शिर्डीपासून केली आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपसहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी शिर्डीत आले. लोकांसाठी काही मागण्याऐवजी स्वत:साठी सर्व काही मागितले. त्या दिवशी ते मराठीत बोलले. कसे काय, बरे आहे का असे विचारून त्यांनी महाराष्ट्राची थट्टा केली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. तसेच पुढे ते असेही म्हणाले की, साईबाबांच्या चरणी लोकांसाठी आशीर्वाद मागितला. मला खुर्ची, पदाची लालसा नाही. माता-भगिनी आणि बांधवाचे प्रेम मला कायम मिळावे, असा आशीर्वाद मी मागितला. तुमच्या आयुष्यात सुखसमाधानाचा गारवा येऊ द्या. असा आशीर्वाद मी साईबाबांकडे मागितला. पण काही लोकांंनी स्वत:साठीच आशीर्वाद मागितला, अशी टीका ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. सगळीकडे दुष्काळ आहे. सत्तेतून कधीही बाहेर पडू शकतो. सत्तेत असल्यानंतर डोक्यावर बसून तुमची कामे करुन घेता येतात.

राम मंदिरासाठी किती दिवस वाट पाहायचे. अनेक दिवसांपासून राममंदिरासाठी शिवसेना लढत आहे. खोटे बोल पण रेटून बोल अशा शब्दातद भाजप सरकारवर टीका केली आहे. आम्हाला पाणी देत असाल, दुधाला भाव देत असाल तर ५०० वर्षे सत्ता देऊ. भाजप सरकार खोटे बोलत आहे. मंदिर नहीं बनायेंगे असे एकदाचे सांगून टाका, असेही ठाकरे म्हणाले.

तसेच मेळाव्यामध्ये शिवसेैनिकांना संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी मंदिराचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने ठाकरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. या दौ-यात ठाकरे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहे. आज पहिला शिवसैनिकांचा मेळावा शिर्डीत संपन्न झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MannKiBaat : विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ची अंतराळात झेप

News Desk

शिवसेनेवर टीका करणे किरीट सोमय्या यांना महागात पडणार का ?

News Desk

सर्व विरोधी पक्षांचा ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मोर्चा

News Desk