हैदराबाद । राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवैसी आणि शिवसेना यांच्यात संध्या चांगलाच युक्तीवाद रंगलेला पाहायला मिळत आहे.”शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते. त्यामुळे त्यांनी आपला जनाधार टीकवण्यासाठी अग्रलेखांच्या माध्यमातून मोदींवर टीका करण्याची रणनीती आखली आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. तसेच, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अग्रलेख लिहायचे थांबवून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान देखील ओवैसी यांनी केले आहे.
Shiv Sena is scared of PM Modi & to cover up their cowardice they have devised this new theory of only writing editorials. My request to them is to stop writing editorials & leave the Modi & Fadnavis govt. I can prove to you that my ancestors are from India: Asaduddin Owaisi pic.twitter.com/7WUlGlbHQ7
— ANI (@ANI) October 20, 2018
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला होता. तसेच राम मंदिर बांधणे भाजपाला जमत नसेल तर आम्ही बांधून दाखवू, असे आव्हान भाजपाला दिले होते.
तसेच ठाकरे येत्या नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला भेट देण्याची घोषणाही केली आहे. या घोषणेनंतर देशातील राजकारण तापले असून, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर ओवेसींनी निशाणा साधला आहे.
यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवैसींच्या टीकेला उत्तर दिले आहे. की, हैदराबातपुरतेच मर्यादित राहावे. राम मंदिर हे अयोध्येत बांधले जाणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही, असे टोला खासदार संजय राऊत लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.