HW News Marathi
मुंबई

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

मुंबई | पालिकेच्या प्रमुख रुग्णालय परिसरातील ठाण मांडलेल्या उघडेबाबा विषयी पालिका आरोग्य समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरले. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या उघडे बाबाच्या दरबारावर कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पालिकेच्या आरोग्य समिती दालनासमोर आंदोलन छेडले.

पालिका मुख्यालयातील पालिकेच्या आरोग्य समितीची बैठक सुरु असताना हे आंदोलन छेडण्यात आले. पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेल्या वर्षी पासून उघडेबाबा स्थान मांडले आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी केली. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या परिसरात उघडेबाबा या नावाचा एक व्यक्ती आपला दरबार भरवत असतो. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना या बाबाकडे गेल्यास रुग्ण बरा होईल असे सांगितले जात असल्याने गेल्या काही वर्षापासून या बाबाचा धंदा तेजीत चालला आहे.

पालिका सभागृहात बाबावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊनही कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षा सुलेना मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान आदी नगरसेवक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यावर आणि फुटपाथवर एखादे अनधिकृत बांधकाम किंवा मंदिर, धार्मिक स्थळ उभे असल्यास त्यावर कारवाई केली जाते. मग पालिकेच्या केईएम रुग्णालयात उघडेबाबाचा दरबार खुलेआम कसा भरतो असा प्रश्न उपस्थित करत या बाबावर कारवाई का केली जात नाही. असा हरकतीचा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी उपस्थित केला. याला सर्व पक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर समर्थकांसह भाजपमध्ये

News Desk

मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द, पोलिस उपायु्क्त सचिन पाटील

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk