नागपूर | दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजया दशमी उत्सव साजरा केला. स्वयंसेवकांनी पथसंचलन केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना भागवतांनी राम मंदिरसाठी कायदा करण्यात यावा असे वक्तव्य केले.
The place of Ram Janmabhoomi is yet to be allocated although evidence have affirmed that there was a temple at that place.The temple would have been constructed long ago if there wasn't political interference. We want govt to clear the path for construction through law: RSS Chief pic.twitter.com/hr9wqdpRCY
— ANI (@ANI) October 18, 2018
यावेळी मोहन भागवत म्हणाले,“रामजन्मभूमीवर लिहिलेलेही आहे की तिथे मंदिर होते. त्यामुळे मंदिर असल्याचे सिद्ध झाले आहे. पण काही लोक निर्णय प्रक्रियेत विलंब करत आहेत. हे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक कायदा करुन राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असेही मोहन भागवत म्हणाले. शिवाय प्रभू राम हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे, असे यावेळी भागवतांनी आवर्जून नमूद केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.