HW News Marathi
राजकारण

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

मुंबई | “पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हेच धक्कादायक असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तिघीही फरार होत्या. मंगळवारी (२८ मे) या तिघींपैकी एक आरोपी डाॅ. भक्ती मेहेर हिला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी ४ डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे.

जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली असली तरीही अद्याप प्रशासनाकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. याविरुद्ध आज (२८ मे) डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांकडून नायर हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जात डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. “डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल”, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. “डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांच्या मागण्या योग्य आहेत. आरोपी महिलांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात कोणालाही माफी मिळणार नाही. दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल”,असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

News Desk

“चुना लगाव आयोग… “, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

Aprna

“शिंदे गटाला आमदारांकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात सामील होण्याशिवाय पर्याय नाही,” सेनेच्या वकिलांची माहिती

Aprna