HW News Marathi
राजकारण

आता मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये घेणार बैठक ?

पणजी । गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्याकडील अतिरिक्त खाते वाटपाची चर्चा करण्यासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये मंत्री व पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी गोव्यातून सात मंत्री दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. पर्रिकर हे त्यांच्याकडील वन,पर्यावरण,खान,शिक्षण,उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यायसायिक शिक्षण ,नागरी उड्डाण अशी खाती त्यांच्या मंत्रीमंडळात वाटणार आहेत. परंतु खाते वाटप आजच होईल याची निश्चितता सांगण्यात येत नाही.

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये पर्रिकरांवर उपचार सुरु आहेत. पर्रिकर अर्थ व गृह ही दोन्ही खाते स्वतःकडे ठेवणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी ही खाते वाटप करणार आहेत. उपचारानंतर पर्रिकर आराम करणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

भाजपचे मंत्री मानिव्ह गुदिन्हो,निलेश काब्राल,विश्वजित राणे, मगोपचे मंत्री सुदीप ढवळीकर, गोवा फॉरवर्डतर्फे मंत्री विजय सरदेसाई सहभागी राहणार आहेत. मंत्र्यांशी चर्चा करून खाते वाटप ठरवले जाईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे खात्याची यादी दिली जाईल आणि त्यांनतरच निर्णय घेतले जातील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

देश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षण तातडीने रद्द करा !

News Desk