HW News Marathi
देश / विदेश

भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमावा – काँग्रेस

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरिकेत गेले असल्यामुळे राज्याच्या व्यवस्थेसाठी पर्रीकरांनी आरोग्याच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे आणि आता दुसरा मुख्यमंत्री नेमला जावा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. पर्रीकरांच्या सतत खालावणाऱ्या प्रकृतीमुळे भाजपने आता पूर्णवेळ तंदुरुस्त मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

आणखी किती दिवस मुख्यमंत्री पर्रीकर मुंबई आणि अमेरिकेतून राज्याचा कारभार पाहणार आहेत, असा प्रश्नही काँग्रेसचे प्रवक्ते आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी विचारला आहे. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याने ते आता तिसऱ्यांदा अमेरिकेत गेले आहेत. बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री होईल या भीतीने भाजपकडून दुसरा मुख्यमंत्री नेमला जात नसल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

परंतु गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही प्रकारचा नेतृत्व बदल होणार नाही असे भाजप नेत्यांकडून स्पष्ट केले गेले आहे. पर्रीकर हे केवळ वैद्यकीय चाचणीसाठी अमेरिकेत गेले असून आठ दिवसात परत येतील त्यामुळे नेतृत्त्व बदलाचा प्रश्न येतच नाही, असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल

swarit

मोदी मंत्रिमंडळातील नवं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठलं खातं?

News Desk

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk
मुंबई

मुंबईसह उपनगरात महिला गोविंदा दहीहंडीसाठी सज्ज

News Desk

रुणाली मोरे/ गौरी टिळेकर| मुंबईत प्रत्येक सणाला एक वेगळा उत्साह पहायला मिळतो. विषेश म्हणजे गिरणगावात गणेशोत्सव, दहीहंडी, होळीचा उत्साह पहाण्याजोगा असतो. गणेशोत्सवात भव्य सजावटी, होळीमध्ये उंच होळ्या आणि दहीहंडीमध्ये उंच मानवी मनोरे हे गिरणगावातील महाराष्ट्रातील सण संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. गेल्या अनेक वर्षात गोविंदा म्हटले की पुरुष किंवा तरुण यांचाची मक्तेदारी असायची परंतु गेल्या २-३ वर्षांत महिला गोविंदा देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दहीहंडी फोडताना पहायला मिळतात.

(छायाचित्र- गौरी टिळेकर )

दोस्ती महिला गोविंदा पथक, लोअर परळ

लोअर परळच्या दोस्ती महिला गोविंदा पथकातील महिला गोविंदा देखील गेल्या २ वर्षांपासून ७ थरांची दहीहंडी रचून सलामी देताना पहायला मिळतात. गोकुळ अष्टमी जवळ आल्यानंतर लोअर परळच्या खेमजी नागजी चाळ परीसरात असलेल्या पटांगणात सायंकाळी या महिला एकत्र येऊन सराव करत असलेल्या पहायला मिळतात.

महाराष्ट्रातील सण आणि संस्कृती जपताना या महिला पहायला मिळतात. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचा असणारा हा उत्साह कौतुकास्पद असतो. सध्या दोस्ती महिला गोविंदा पथकाचे परीसरात प्रचंड कौतुक होत आहे.

टागोर नगर महिला गोविंदा पथक, विक्रोळी

दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी विक्रोळीमधील टागोर नगर महिला गोविंदा पथक दहीहंडीच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. टागोर नगर महिला पथकाची सुरूवात ही २००० साली झाली. आता या महिला गोंविंदा पथकाला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी काही ना काही नवीन देऊ इच्छिणाऱ्या या पथकाचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे टागोर नगर मित्र मंडळ यावर्षी त्यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने टागोर नगर महिला गोविंदा पथक मंडळाला अनोखी सलामी देणार आहे. सहा थर रचून सलामी देणारी महिला गोविंदा ५० अंक मोजून मंडळाच्या सुवर्णमहोत्त्सवी वर्षानिमित्त अनोख्या प्रकारे सलामी देणार आहे.

 

 

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या दारात आत्महत्येची पाळी का येते? धक्कादायक.. मंत्रालयात आणखी एक आत्महत्या…

Adil

#26/11Attack : मुंबईतील दहशतवादी हल्ला देश कधीच विसरू शकत नाही!

News Desk

आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण; वरळीकरांना लिहिले भावनिक पत्र

Aprna