HW News Marathi
मनोरंजन

जे खोटे आहे ते खोटेच आहे

मुंबई| अभिनेत्री तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ओके प्लिज’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांच्याकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. जे खोटे आहे ते खोटेच आहे, असे म्हणत त्यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळले.

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. अमेरिकेहून परतलेल्या तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान ‘मी टू’ मोहिमेबद्दल बोलताना हे आरोप केले आहेत. यासंदर्भात नाना वकीलांचा सल्ला घेणार आहेत तसेच सिनेसृष्टीतील काही मंडळींशी ते याबाबत चर्चा देखील करणार आहेत. तनुश्रीच्या आरोपांवर येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.

‘मी याआधीही उत्तर दिले आहे. जे खोटे आहे ते खोटेच आहे,’ असे म्हणत नानांनी मौन सोडले आहे. एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते , असा आरोप तनुश्रीने केला आहे. यानंतर तनुश्रीने सातत्याने नाना पाटेकर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्रीला नोटीस बजावली होती. तनुश्रीने माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ‘ मिर्झा गालिब ‘ यांची २२१ वी जयंती

News Desk

आगमन बाप्पाचे | कोकणात जाणाऱ्या एसटीचे गणपती आरक्षण फुल्ल 

News Desk

गुरू ठाकूरने ‘कृतांत’साठी गायले गाणे

News Desk