HW News Marathi
राजकारण

इंधन दर कपातीनंतर अरुण जेटलींचे विरोधकांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली | काही दिवसात दिवसात इंधनाच्या किंमतींमध्ये दर दिवशी वाढ होत होती. त्यामुळे विरोधी पक्षांकडून वारंवार टीका होत होती. काँग्रेसने तर भाजप सरकारच्या काळात सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात काँग्रेससह इतर २१ पक्षांनी १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाकही दिली होती. अखेर गुरुवारी (४ ऑक्‍टोबर) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून इंधनाच्या उत्‍पादन शुल्‍कात प्रतिलिटर दीड रूपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अर्थमंत्री अरुण जेटली ?

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरल्याने, कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबतच माहिती देताना अरुण जेटली म्हणाले आहेत कि, “व्हेनेझुएला आणि लिबियातील राजकीय संकटामुळे या देशातील तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून अमेरिकेने इराणवर लादलेल्या व्यापारी निर्बंधांमुळे तेलाच्या पुरवठ्यामधील निश्चितता कमी झाली आहे. यामुळे इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे.” त्याचप्रमाणे “तेलाच्या वाढत्या किमतींचा फायदा उठवत सर्वच विरोधी पक्षांनी सरकारवर वारंवार टीका केली. मात्र आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मौन बाळगले आहे.” असेही अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

देशासह राज्‍यात देखील पेट्रोल ५ रुपयांनी स्‍वस्‍त होणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेच्या प्रत्‍यक्ष अंमलबजावणीत पेट्रोलच्या किंमतीतील कपात ही केवळ ४ रूपये ३५ पैसे एवढीच झाली असल्याचे लक्षात आले आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतील वाढीमुळे निर्माण झालेले दरवाढीचे आव्हान विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेमुळे कमी होणार नाही,” असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related posts

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

पालघर लोकसभा पोटनिवडणुक निकाल अपडेट

News Desk

#MarathaReservation : जाणून घ्या… मराठा समाजाला आरक्षणाद्वारे कोणते लाभ मिळणार

News Desk