नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत ‘किसान क्रांती पदयात्रा’ काढली आहे. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा हजारोच्या संख्येने शेतकरी विविध मागण्यांसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH Visuals from UP-Delhi border where farmers have been stopped during 'Kisan Kranti Padyatra'. Police use water cannons to disperse protesters after protesters broke the barricades pic.twitter.com/9KUwKgvrwW
— ANI (@ANI) October 2, 2018
पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी जमावबंदी (१४४ कलम) लागू केली आहे.
Visuals from UP-Delhi border where farmers have been stopped during 'Kisan Kranti Padyatra'. Police use teargas shells to disperse protesters pic.twitter.com/ZlkodvZc3R
— ANI (@ANI) October 2, 2018
केंद्र सरकाला आमच्या समस्या सांगयच्या नाही, तर मग आम्ही आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाकिस्तान किंवा बांग्लादेशमध्ये जायचे का ? असा सवाल भारतीय किसान संघचे अध्यक्ष नरेश तिकिट यांनी विचारला आहे.
Why have we been stopped here (at UP-Delhi border)? The rally was proceeding in a disciplined manner. If we don't tell our government about our problems then whom do we tell? Do we go to Pakistan or Bangladesh?: Naresh Tikait, President, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/J15xmWpZ9G
— ANI (@ANI) October 2, 2018
तसेच उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात झाली होती. उत्तर प्रदेशातून दिल्लीला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. किसान क्रांती पदयात्रा २३ सप्टेंबरपासून हरिद्वार येथून निघाली होती. परंतु ही पदयात्रेला दिल्लीच्या सीमेजवळ रोखण्यात आले.
#Visuals from UP-Delhi border where farmers have been stopped during 'Kisan Kranti Padyatra'. The 'Kisan Kranti Padyatra' has been organized by farmers under the banner of Bharatiya Kisan Union. pic.twitter.com/3c4WqtAQnM
— ANI (@ANI) October 2, 2018
शेतकऱ्यांच्या मागण्या
- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा
- शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्यात यावी
- ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी
- किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.