HW News Marathi
मुंबई

गांधी जयंती निमित्त सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

मुंबई | स्टेशनवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची लगबग सुरू होती. अचानक रेल्वेच्या उद्घोषणा द्वारा नेहमीच्या गाण्यांवर घोषणाबाजी संगीताचे सूर कानावर पडू लागले. आणि प्रवासी अचंबित झाले. तेवढ्यात त्या संगीताच्या तालावर काही लहान मुलं तरुण-तरुणी चक्क नृत्य करू लागले. आणि अनेकांनी अचानक मिळालेल्या या सांगीतिक नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. शेवटच्या टप्प्यात तर इतर अनेक जण त्यात सामील देखील झाले होते.

आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कर्मचाऱ्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा असा संदेश देण्यात आला. यावेळी फ्लॅश मॉपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्मचारी व त्यांच्या मुलांनी सहभाग घेतला होता. अनेक देश भक्ती वरील गाण्यावर नृत्य करून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रम आणि मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी प्रोत्साहित करण्यासाठी जातीने उपस्थित होते. तसेच सुरेखा दोषी, संतोष वेरुळकर, निळकंठ वाघमारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

News Desk