लखनऊ । अॅपलच्या एरिया मॅनेजरला पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले असून ही हत्या एन्काऊंटरचा भाग नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशीही केली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Lucknow: Kalpana Tiwari (in pic), wife of Vivek Tiwari (who died after he was shot at by police last night) writes to CM Yogi Adityanath demanding a CBI inquiry into the incident. She has also demanded a compensation of Rs 1 crore and a job in the police department. pic.twitter.com/d8HEZxAQvo
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 29, 2018
नेमके काय आहे प्रकरण
अॅपलचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी कंपनीचा एक कार्यक्रम आटोपून सहकाऱ्याला सोडण्यासाठी जात असताना गोमतीनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीप यांना अटक केली आहे. त्यांना संध्याकाळपर्यंत सोडून देण्यात येईल. दरम्यान, तिवारी यांच्या पत्नीने उत्तरप्रदेश सरकारकडे १ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि पोलीस विभागात नोकरी देण्याचीही मागणी केली आहे.
It was not an encounter. An investigation will be conducted in this incident. If needed, we will order a CBI inquiry into the incident: Uttar Pradesh CM Yogi Adityanath on death of Lucknow resident Vivek Tiwari pic.twitter.com/lpxiDGHjEz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 29, 2018
यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. उत्तरप्रदेशमध्ये गोमतीनगर हा व्हीआयपी भाग आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितल्याचे लखनऊचे पोलीस अधिक्षक कलानिधी नैथनी यांनी सांगितले.
A SIT has been formed under SP crime. I have personally sent a request to District Magistrate for a magisterial inquiry into the incident: Kalanidhi Naithani, SSP Lucknow on death of Lucknow resident, Vivek Tiwari pic.twitter.com/pJ6mtSyho8
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.