HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या काय आहे कलम ४९७

मुंबई | कलम ४९७ कलमांतर्गत विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पतीस काहीसे मोकळे रान मिळते. एखाद्या विवाहित पुरुषाने इतर विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु त्यासाठी त्या विवाहित महिलेच्या पतीने त्या परपुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज असते. तसेच पतीच्या इतर कुटुंबीयांनी अशा विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पुरुषाविरोधात कोणतीही तक्रार करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

व्यभिचाराच्या कायद्यात स्त्री आणि पुरुषांमध्ये गुन्हा नोंदवण्यावरून भेदभाव केला जात असल्याचा या याचिकेतील मुख्य आक्षेप आहे. केंद्र सरकारने याला असे उत्तर दिले की, कलम ४९७ मध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही समान न्याय देण्यासाठी दुरुस्ती करण्याचा विचार आहे. तोपर्यंत हे कलम आहे तसेच राहू द्यावे. विवाहसंस्था टिकवण्यासाठी हे कलम आवश्यक आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

सरकार आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढ करणार ?

swarit

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk