श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळापासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात मोर्चा बांधणी केली आहे. सोपोरमध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळातच त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.
#JammuAndKashmir: Security forces have launched a cordon and search operation in Baramulla following exchange of fire with terrorists in the early morning. No casualties/injuries have been reported. More details awaited.
— ANI (@ANI) September 25, 2018
दहशतवादी आणि लष्करमध्ये चकमक सुरू झाल्यामुळे सोपोरमधील परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. या परिसरात दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. तर जम्मू-काश्मीरमधील बडगाव येथील पकेरपोरा गावातही दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरातही भारतीय लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे.
भारतीय लष्कराने रविवारी (२३ सप्टेंबर)ला जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय लष्कराने घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. परंतु भारतीय लष्करांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. सोमवारी लष्कराने आणखी तीन दहशतवाद्यांचा ठार केले आहे. लष्कराने गेल्या २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आहे आहे.
Jammu & Kashmir: 3 more terrorists killed today, total 5 terrorists killed so far by security forces after an infiltration bid was foiled by security forces in Kupwara's Tangdhar sector yesterday. One security personnel has lost his life during action. Search operation underway.
— ANI (@ANI) September 24, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.