मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनआरोग्य योजना’ म्हणजे ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज (२३ सप्टेंबर) रोजी उद्घाटन करण्यात आले अाहे. या योजनेने राज्यातील ८३ लाख ७२ हजार नागरिकांना लाभ घेता येणार असल्याचे म्हटले जात आहे. या जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी २५ सप्टेंबरपासून होणार आहे.
At the launch of #PradhanMantriJanArogyaYojana in Mumbai, Maharashtra. #PMJAY #AyushmanBharat https://t.co/68vrDhHBOT
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2018
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून या योजनेचे उद्घाटन केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील २०११च्या आकडेवाडीनुसार राज्यातील ८३ लाख ७२ हाजार कुटुंबाची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात
जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती, दारिद्रय रेषेखाली कुटुंब, भुमीहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा योजनेत सहभाग आहे. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतुक कर्मचारी, चालक, वाहक, शिपाई, वेटर, धोबी आणि चौकीदार आदी कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.
योजनेचा कसा लाभ घ्याल
तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी एनएचएच्या वेबसाईट https://mera.pmjay.gov.in गेल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका किंवा १४५५५ या क्रमांकावर फोन करुनही माहिती घेऊ शकता. या वेबसाईटवर नाव पाहताना तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो. या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांविना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.