HW News Marathi
मनोरंजन

LIVE UPDATE : “बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला”

मुंबई |“गणपती बाप्पा मोरया”, “पुढच्या वर्षी लवकर या !” “गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला,” “एक दो तीन चार गणपति की जय जयकार”,

सर्व गणेश भक्त आपल्य लाडक्याची गेल्या दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला आज रविवार अनंत चतुर्दशी (२३ सप्टेंबर) निरोप दिला जाणार दिला जाणार आहे. मुंबई, पुणेसह संपुर्ण महाराष्ट्रातील बाप्पाला गणेश भक्त भावपूर्ण निरोप देणार आहेत. ढोल-ताशा गजर, गुलालाची उधळ करत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. यंदा विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयने यावर बंदी घातली आहे.

तसेच मुंबईचा लालबागचा राजा आणि पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनात गणेश भक्त विषेश गर्दी करता. पुण्यातील विसर्जन मिरवणुकही लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु असते ते म्हणजे पुण्यातील विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी दुरून येतात लोकांमध्ये उत्साह पाहयाला मिळत आहे.

LIVE UPDATE

पुणे | केसरी वाडाच्या मनाच्या बाप्पाचे विसर्जन

7.10 PM | तेजुकाया मेन्शनच्या बाप्पाचे विसर्जन

7.00 PM | लालबागच्या राजाची मिरवणूक भायखळ्यात

6.29 PM | मुंबईच्या गणेशगल्लीच्या राजाचे विसर्जन

5:40 PM | गणेशगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

  • पुण्याच्या चौथ्या मानाच्या तुळशीबागच्या गणेशाचे विसर्जन
  • मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीमच्या बाप्पाचे विसर्जन
  • लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ
  • लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी
  • आर.के स्टुडिओजच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
  • पुण्यात दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचे विसर्जन
  • पुण्याच्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जन
  • पुण्याचे मानाचे गणपती लक्ष्मीरोडवरून मार्गस्थ
  • डीजेबंदीचा विसर्जन मिरवणुकीवर कोणताही परिणाम नाही
  • लालबागचा राजा थोड्याच वेळात श्रॉफ बिल्डिंगजवळ येणार
  • पारंपरिक पद्धतीनेच सण-उत्सव साजरे व्हावेत | मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्र्यांनी बाप्पाच्या विसर्जनावेळी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • मुख्यमंत्र्यांनी दिला बाप्पाला निरोप
  • तेजुकायाच्या बाप्पावर श्रॉफ बिल्डिंगवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी
  • चंद्रपुरमध्ये डीजेच्या चार सेट्सना परवानगी
  • नाशिकमधील पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणुकीला सुरुवात
  • अहमदरनगरला विशाल गणपतीचा रथ ओडून मिरवणूक
  • पुण्याचा मानाचा पाच केसरी वाडा गणपती बेलगाम चौकात दाखल
  • मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत आलोट गर्दी
  • डीजे आणि डॉल्बीवर बंदीमुळे पारंपारिक वाद्यांच्या गरात बाप्पाला निरोप
  • पुण्यातील मानाचे पाच ही गणपती केसर वाड्यात दाखल
  • औरंगाबादचे खासदार चंद्राकांत खैरे विसर्जन मिरवणुकीत ताल थरला
  • महाराष्ट्रात विसर्जन मिरवणुकीसाठी ५० हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • पुण्याच्या अलका टॉकीज परिसरात ९० फुटांची भव्य रांगोळी
  • अहमदनगर आणि अकोलेमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका
  • पुण्याच्या तुळशी बागेच्या गर्दीतून रुग्णवाहिनीसाठी जागा करून दिली.
  • बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत साहसी खेळांचे प्रात्यक्षिक
  • पुण्याच्या अलका टॉकीज चौकात रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या
  • मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल
  • कसबा गणपतीसमोर परदेशी नगरिक मिरवणुकीत सहभागी
  • मुंबईच्या गणेश गल्लीच्या राजावर पृष्पवृष्टी
  • श्राफ बिल्डिंगजवळ मुंबईच्या राजावर पृष्पवृष्टी
  • पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर दाखल
  • विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजामागे गणेशगल्लीचा राजा
  • पहिल्यांदा लालबागचा राजा गणेशगल्लीच्या राजाच्या पुढे

  • पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ
  • तांबडी जोगेश्वरी हा दुसरा पुण्यातील मानाचा गणपती बेलबाग चौकात दाखल
  • लालबागचा राजा गल्लीतून मार्गस्थ
  • लालबागमधील जुन्या गणेश मंडळापैकी एक रंगारी बदक चाळीच्या गणेशोत्सवाचे हे ७९ वे वर्ष आहे.

 

  • परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
  • या तलावात शाहूच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
  • दादर चौपाटीवर पालिकने कृत्रिम तलाव दोन निर्माण केले आहेत.
  • “गणपती बाप्पा मोरया या” जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमला आहे.
  • मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीही मंडईजवळ दाखल
  • पुण्याचा मानाता तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळजवळ दाखल
  • पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात
  • मानाचा पहिल्या कसबा गणपतीची पुजा पालकमंत्री आणि महापौर यांच्या हस्ते होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली
  • पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुक्ता टिळक उपस्थित
  • पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीचे महात्मा फुले मंडईत आगमन
  • कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शौभा बोंद्रे यांना धक्काबुक्की
  • महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून झाल्याचा आरोप महापौर बोंद्रे यांनी केला.
  • कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचे पूजन महासूलमंत्र चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
  • मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
  • मुंबई, पुण्यासह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

  • गिरगाव चौपाटीवर घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

  • मुंबईच्या गणेश गल्लीचा राजा मंडपातून बाहेर आला
  • लालबाग राजाच्या विजय असो !
  • लालबाग राजाच्या आरतीला सुरुवात झाली आहे.
  • थोड्याच वेळात लालबाग राजाच्या आरतीला सुरुवात झाली आहे.
  • लालबाग राजाच्या दरबारात भक्तांची मोठी गर्दी केली आहे.
  • लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी कोळी बांधव नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा आहे.
  • सालाबाप्रमाणे आजही कोळी महिला कोळी नृत्य सादर करुन लालबागच्या राजाला निरोप देत आहेत.
  • गणेश विसर्जनासाठी कडकोट महाराष्ट्र पोलीस सज्ज असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
  • विदेशी पर्यटकांना चौपाटीवरील मिरवणुक पाहण्यासाठी विशेष मंडप आणि निलाबंरी बसची सोय केली आहे.
  • मुंबईतील वाहतुक पोलीसांनी ५३ रस्ते बंद ठेवण्यात आले असून ५६ रस्ते एका दिशा मार्ग म्हणजे वन वे केले आहेत.
  • सार्वजनिक मंडळासह घरगुती बाप्पाना निरोप
  • मुंबईच्या चौपाटीवर सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस, वाहतुक पोली, जीवनरक्षक, एनडीआरएफ जवान तैनात आहेत
  • विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
  • मुंबईच्या समुद्र किनारी ब्ल्यू बॉटल जेली फिशची दहशत कायम आहे.
  • ब्ल्यू बॉटल जेलीफीश, स्टिंग रे, जेलीफीश आणि इल अशा प्रकारच्या उपद्रवी जलचर प्राणी सावधान राहण्यास सांगितले आहे.
  • पालिकेच्या वतीने मुंबईतील चौपाट्यांवर फलक लवाण्यात आले आहे.
  • पुण्यातील रेस्ते रांगोळ्यांनी सजले आहेत
  • विसर्जना निमित्ताने मुंबईच्या लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
  • मुंबईतील गणेश गल्लीचा राजाच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
  • पुण्यात १०.३० वाजल्यानंतर विजर्सन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहरूखकडून सलमानला अनोखी भेट

News Desk

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

swarit

#GaneshaChaturthi : बाप्पाला निरोप देताना भरतीच्या वेळ पाहण्याचे पोलिसांचे आवाहन

News Desk