HW News Marathi
शिक्षण

फोक्सवॅगन इंडियाकडून सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना वेंटो कार भेट

मुंबई | फोक्सवॅगन इंडियाने सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनव्हर्सिटी (एसएसओयू) पुणे यांच्यासोबत आज करार केला असून त्यातून युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना व्हेंटो देण्यात येणार आहे. या व्हेंटोचा वापर एसएसओयू प्रयोगशाळेत ऑटोमोबाइल विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केला जाईल. फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अँड्रेआस लव्हरमॅन आणि सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मजूमदार या करारावर सह्या करण्याच्या सोहळ्यात उपस्थित होते.

फोक्सवॅगन इंडियाकडून उत्पादनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी फोक्सवॅगन अकॅडमी चालवली जाते. ही अकॅडमी फोक्सवॅगन पुणे प्लान्टमध्ये चालवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या भागीदारीच्या माध्यमातून अत्यंत रोजगारक्षम मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी काम करते.

सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्रातील पहिली अशी स्किल्स डेव्हलमेंट युनिव्हर्सिटी आहे जी स्किल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात विविध प्रकारचे उपक्रम चालवते. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये कौशल्यातील तफावती हे सत्य आहे आणि उत्पादन क्षेत्रात हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. फोक्सवॅगन इंडिया अकॅडमीकडून ही तफावत भरून काढण्यासाठी पाऊल उचलले जाते आणि त्यांनी एसएसओयूच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुभवाच्या दृष्टीने व्हेंटो ही गाडी दिली आहे. व्हेंटोचा वापर इलेक्ट्रिकल सिस्टिम्स, वाहनाच्या रचना, सुरक्षितता अभियांत्रिकी, साहित्याची शक्ती इत्यादी कारच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी केला जाईल.

या प्रसंगी फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अँड्रेआस लव्हरमॅन म्हणाले, आम्हाला सिम्बॉयसिस कुटुंबाशी पुन्हा जोडले जाताना खूप आनंद होत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी एक जागतिक केंद्र होण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल उचलण्यासाठी, भारताला या कौशल्याच्या दरीच्या समस्येला समजून घेणे आणि सर्व संबंधित भागधारकांना सहभागी करून आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक कॉर्पोरेट म्हणून बाजारातील बदलत्या रचनांप्रति जास्त लक्ष देत आहोत आणि यामुळेच, ऑटो उद्योगातील नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताचे तरूण योग्य प्रकारच्या कौशल्यांद्वारे सज्ज आहेत हे स्पष्ट करण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. मला आशा आहे की, त्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणातून त्यांना थेट फायदा होईल.

एसएसओयूला देण्यात आलेली व्हेंटो थिंक ब्लू फॅक्टरी कलर्समध्ये ब्रँडेड करण्यात आली होती. हा कार्यक्रम फोक्सवॅगनच्या जगभरातील पर्यावरणस्नेही उत्पादन सुविधांमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्पादन आणि विस्तारामधील कार्यक्षमता सुधारणांशी संबंधित आहे. आपल्या थिंक ब्लू फॅक्टरी प्रोग्रामच्या माध्यमातून फोक्सवॅगन पुणे प्लांटने विविध प्रकारच्या पर्यावरणस्नेही प्रक्रिया लागू केल्या आहेत आणि मागील वर्षाच्या शेवटापर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक घट नोंदवली आहे. उत्पादन प्रक्रियांमुळे पर्यावरणावरील परिणाम २०२५ पर्यंत ४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे या कारखान्याचे लक्ष्य आहे.

सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मजुमदार म्हणाल्या, आम्हाला फोक्सवॅगनसोबत पुन्हा एकदा जोडले जाण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. फोक्सवॅगन इंडियासोबतच्या या भागीदारीद्वारे विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह उद्योगाबाबत शिकून आणखी ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. आम्हाला आणि एसएसओयूमधील विद्यार्थ्यांना फोक्सवॅगन एकेडमीशी जोडले जाण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही फोक्सवॅगन टीमचे आभार मानत आहोत. अशा शैक्षणिक- उद्योग भागीदारीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

फोक्सवॅगन अकॅडमी आणि एसएसओयूने या वर्षाच्या सुरुवातीला भागीदारी केली होती आणि त्यातून फोक्सवॅगनच्या कामगारांसाठी एक खास मोड्यूल तयार करायचे होते. त्यांची नेमणूक सुपरवायझरच्या पदावर करण्यात आली होती आणि त्यांना भविष्यातील टीम लीडर्स म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या मोड्यूलमधून सहभागींचे औपचारिक डिप्लोमा शिक्षण आणि प्रत्यक्ष क्षमता यांच्यामधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांना व्यावसायिक संवाद कौशल्य, संघटनात्मक आणि उत्पादन यंत्रणा इत्यादींचे सुयोग्य ज्ञान मिळेल याची काळजी घेतली जाईल. ही भागीदारी आधीच्या भागीदारीचाच विस्तार आहे. ही कंपनी वेगाने प्रगती करून स्किल इंडिया प्रोग्रामप्रति आपल्या वचनबद्धतेचे सक्षमीकरण करण्याची इच्छा बाळगते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋुतिका हाके लातुर विभागात अव्वल

News Desk

सीबीएसईचा २५ एप्रिलला बारावीचा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात

News Desk

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

News Desk