मुंबई | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही वेळात सुरू होईल. आशिया चषक स्पर्धेच्या या लढतीत दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत. या सामन्यातील विजय हा कोणत्याही संघाला पुढील वाटचालीसाठी प्रचंड आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.
त्यामुळे दोन्ही संघ लढतीत सर्वोत्तम खेळाडूंची फळी घेऊन मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानचा संघ समतोल आहे, पण भारतीय संघाला अद्याप योग्य घडी बसवता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणत्या अकरा शिलेदारांना घेऊन मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे.
Supporters of Indian cricket team and Pakistani cricket team outside Dubai International Cricket Stadium where the two teams will play each other today. #AsiaCup2018 #INDvsPAK pic.twitter.com/GMTkeo6WTA
— ANI (@ANI) September 19, 2018
हे आहेत अंतिम अकरा खेळाडू
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.