HW News Marathi
देश / विदेश

उद्धवजी परत फिरा.. भाजपच्या मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद!

मुंबई | आज विधानभवनामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परत आपल्याकडे येण्यासाठी निमंत्रण दिले. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार झाल्यानंतर अनेक वेळा भाजपकडून हा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेची अडचण करत असेल तर आम्ही शिवसेनेसोबत आहोत, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ नये अशी भुमिका मुनगंटीवारांनी जाहीरपणे मांडली होती. त्यानंतर आज पुन्हा भरसभागृहात उद्धवजी परत या अशी ऑफर त्यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले ,उद्धवजी तुम्ही रुसुन गेला आहात हा रूसवा सोडा आणि आमच्यासोबत वापस या. तुमच्या स्पप्नातील शेतकऱ्याची कर्जमाफी हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले होऊ देणार नाहीत,’सहकारातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सर्व चकवा देणारे आहेत. त्यांच्याशी फार नाद करू नका. तुम्ही भाजपाच्या विचारांचे आहात परत एकदा मागे या… परत या… परत या,’ अशी साद मुनगंटीवार यांनी विधानसभेतच घातल्याने सभागृहात पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजप चर्चेचा विषय झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक रायफल्स उत्पादनाच्या रशियाच्या प्रस्तावाला मोदी सरकारचा नकार

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद

News Desk

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट? भाजपविरोधातील पुढील रणनीती ठरणार

News Desk