HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना अधिकृतरीत्या पत्र लिहून याबद्दल सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यसभा आणि लोकसभेत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते संजय राऊतच असणार आहेत.

सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या वेळी झालेल्या व्हीपच्या गोंधळानंतर आता दोन्ही सभागृहातील खासदारांमध्ये समनव्य साधण्यासाठी पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेच्या स्वतंत्र संसदीय पक्षाचे नेते होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना पक्ष बदलासाठी फितवले जाण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून दोन्ही सभागृहाच्या खासदारांवर संजय राऊत यांची नेते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

‘आनंदराव अडसूळ लोकसभेतील शिवसेनेच्या १८ सदस्यीय पक्षाचे नेते आहेत आणि संजय राऊत राज्यसभेतील पक्षाच्या तीन सदसीय दलाचे नेते आहेत’ असे लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात लिहण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशी माहिती दिली आहे कि, ‘राज्यसभेचे खासदार संजय राऊत शिवसेनेच्या संसदीय पक्षनेतेपदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे इथून पुढे होणारा कारभार हा या निर्णयावरून व्हावा अशी विनंती करत २९ ऑगस्ट रोजी लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक!

News Desk

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk