HW News Marathi
व्हिडीओ

पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी दादर चौपाटी सज्ज

मुंबई – यंदा गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक तलावांची निर्मिती करून गणेश भक्तांना गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी सोय करून दिली आहे. परंतु पारंपारिक पद्धतीने वाहत्या पाण्यात गणेश विसर्जन करणाऱ्या भाविकांसाठी दादर चौपाटीवर सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सामाजिक संस्थामध्ये कार्यरत असलेले स्वयंसेवक महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध मंडळातील गणेश भक्त, महापालिका कर्मचारी यांच्यासह मुंबई पोलीस दल मुंबईतील गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेले पाहायला मिळत आहे. ब्ल्यू बॉटल जेलीफशचा धोका असल्यामुळे पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. या संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vasai मध्ये ‘मिनी आदर्श घोटाळा’; भूमाफियांविरोधात ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

Manasi Devkar

“राजसाहेब एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, त्यामुळे…”; Chandrakant Patil यांचा पुनरुच्चार

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन होणार? कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रवेश झालाय का?

News Desk