HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींचा आज 68 वा वाढदिवस

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज त्यांचा वाढदिवस लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये साजरा करणार आहेत. यानिमित्ताने वाराणसीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतील. त्यानंतर ते शाळकरी मुलांसोबत ‘चलो जिते है’ हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे. मागील वाढदिवसाला मोदींनी गांधीनगरला जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी सरदार सरोवराचे लोकार्पण केले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्राधन मोदी अनेक नव्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार असल्याची माहिती आहे.

https://twitter.com/ManushiChhillar/status/1041461896480804865

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

News Desk

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

swarit

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit