HW News Marathi
मनोरंजन

अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई | अभिनेते दिलीप कुमार यांना छातीत त्रास झाल्यानंतर त्यांना बुधवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीनंतर आढळून आल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली. ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, मात्र पूर्वीपेक्षा आता त्यांची तब्येत खूपच चांगली असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले. दिलीप कुमार यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही कालावधी लागेल असे सांगत सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने कोरले ‘या’ दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव

Aprna

दीपिका-रणवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

News Desk

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk