HW News Marathi
क्राइम

सोहराबुद्दीन शेख फेक एन्काउंटर | वंझारांच्या सुटकेची याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली। गुजरातचे माजी पोलीस महासंचालक डी. जी. वंझारा यांच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने २००५ साली सोहराबुद्दीन शेखचा फेक एन्काउंटर केल्याचा आरोप गुजरात व राजस्थानच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर केला होता. या प्रकरणातून भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात एकूण पाच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राजकुमार पांडियन, दिनेश एम. एन. आणि डी. सी. वंझारा यांच्याविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुहाबुद्दीन शेखने तीन याचिका दाखल केल्या होत्या, तर उर्वरित दोन याचिका सीबीआयने अमीन आणि राठोछविरोधात दाखल केल्या होत्या.

नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी तसेच २००६ मधील प्रजापतीच्या एन्काउंटर प्रकरणी सीबीआयनेवरील पाच अधिकाऱ्यांसह ३३ जणांवर गुन्हा नोंद केला होता. त्यावेळी गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीनचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून गोळीबार बीएसएफचा एक जवान शहीद

swarit

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Aprna

…मग मला घाबरण्याचे कारण काय ?

News Desk