HW News Marathi
राजकारण

LIVE UPDATES | महागाई विरोधात कॉंग्रेसची भारत बंदची हाक, बंदला २१ पक्षांचा पाठिंबा

मुंबई | मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईला विरोध करण्यासाठी आज कॉंग्रेसकडून देशभरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला पाठिंबा देत वाढत्या महागाईला विरोध करण्यासाठी देशातील २१ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे. देशभरात सकाळ पासून विविध ठिकाणी निदर्शने आंदोलनाला सुरुवात झालेली पहायला मिळत आहे.

LIVE UPDATES

गोरेगाव मध्ये मनसे कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन . आंदोलकांनी बेस्ट बसची हवा सोडली.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/385915412156511/UzpfSTEwMDAwMzg1Nzk0MTE0OToyNjU0NDU3MDM4MDI2MjAy/

बिहार: पाटाणा येथे जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड

मुंबई ः प्रतिक्षानगर परीसरात बसची तोडफोड.

मुंबईः चेंबूर परीसरात दगडफेक.

मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी दुकाने केली बंद.

छत्तीसगड |

दिल्ली ः

दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेत ताब्यात. दादर मध्ये संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार, रिटा गुप्ता, स्नेहल जाधव आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये मनसेचे तीव्र आंदोलन.

संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.

मुंबई ः कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकात रेल रोको केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण माहिम रेल्वे स्थानकावरून लोकलने अंधेरी स्थानकावर पोहोचतील

सकाळी ९.०० वा. अंधेरी पूर्व (रेल्वे स्टेशन जवळ) येथे भारत बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/595258757560143/

मुंबई : दादर प्लाझा परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त.

8:41 AM | मुंबईतील रेल्वे सेवा सुरळीत.

पुणे ः पुण्यात भारत बंदला हिंसक वळण.

नाशिक ः नाशिक शहरातील बसची सेवा बंद. नाशिकमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन.

मुंबई ः मुंबईतील एपीएमसी मार्केटवर बंदचा कोणताही परीणाम नाही.

मुंबई ः विरारमधील शाळांना सुट्टी जाहीर.

सीपीआय आणि सीपीएम च्या कार्यकर्त्यांनी देखील आंध्रपदेशच्या विजयवाडा येथे निदर्शने करत आजच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरवाढीला विरोध करण्यासाठी हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहेत.

आजच्या भारत बंदमध्ये शिवसेनेचा सहभाग नाही.

राज्याच्या सर्व भागात विरोधी पक्षाकडून भारत बंदची हाक.

8: 00 AM | मुंबईतील वाहतूक अद्याप सुरळीत.

देशभरातील २१ पक्षांनी आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

आंध्रप्रदेशमध्ये या बंदला पाठिंबा देण्यासाठी नागरीक रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहेत.

ओडीसा मध्ये सोमवारी सकाळी बंदचे पडसाद पहायला मिळाले. कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे पटरीवर उतरुन रेल रोको केला. देशभरात भारत बंदचे पडसाद पहायला मिळत आहेत.

रिक्षा, टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण यांच्याकडून आजच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रिक्षा व ओम्नी काळी- पिवळी टॅक्सी द्वारे होणारी वाहतूक बंद रहाणार आहे.

(छाया- सोनू कनौजिया, प्रतिनिधी. एच.डब्लू. हिंदी)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा तर आमचा नैतिक विजय | ममता बॅनर्जी

News Desk

…तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा !

News Desk

राहुल गांधींच्या वायनाडमधील रोड शो दरम्यान ३ पत्रकार जखमी

News Desk