HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसकडून भारत बंदचे आवाहन, मुंबईत ठिकठिकाणी होणार निदर्शने

मुंबई । पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस यात सतत होत असलेल्या वाढीमुळे काँग्रेस पक्षांनी सोमवारी (१० सप्टेंबर) रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. हे सर्व पक्ष आज सकाळी ८ वाजल्यापासून रस्त्यावर उतरुन इंधन दर वाढी विरोधात निषेध व्यक्त करणार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

भारत बंदसाठी या पक्षांचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, बसपा, आरजेडी, आरएलडी, सीपीआय, सीपीएम, आप, डीएमके, टीडीपी, केरळ काँग्रेस (एम), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरएसपी देशभरातून या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

मुंबईतील आंदोलन

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आणि माणिकराव ठाकरे हे दिग्गज नेते अंधेरी स्टेशन बाहेर सकाळी आंदोलन करणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक सकाळी ८ वाजता गोवंडी स्टेशन आणि त्यानंतर १० वाजता फ्री वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

भायखळाच्या पॅलेस सिनेमाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ या आंदोलन करणार आहे. मनसे दादरच्या सेनाभवन येथे संदीव देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्या उपस्थिती सकाळ नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ विधानामुळे मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk