HW News Marathi
मुंबई

भायखळा राष्ट्रवादीकडून धाडसी सुनीता पाटील यांचा सत्कार

मुंबई | परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या धाडसी अधिकारी सुनीता पाटील (सहाय्यक केंद्र अधिकारी,अग्निशमन) यांचा भायखळा राष्ट्रवादी तर्फे सत्कार करण्यात आला. सुनीता शिंदे-महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी महिला मुंबई अध्यक्ष सुरेखा पेडणेकर व राष्ट्रवादीच्या भायखळा महिला तालुका अध्यक्षा चंदना साळुंके यांच्या हस्ते सुनीता पाटील यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत सुनीता पाटील यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतः इमारतीत शिरत १७ जणांचे प्राण वाचवले आहेत. विशेषबाब म्हणजे यामध्ये तीन गरोदर महिलांचाही समावेश आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी भायखळा पश्चिम येथील ‘मुंबई अग्निशमन दल मुख्यालय व भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र’ येथे भायखळा राष्ट्रवादी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी सुनंदा देठे, नंदा जाधव,सरला खळदकर,सुप्रिया जाधव आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालकमंत्र्यांनी केले मिसाल मुंबईचे कौतुक

News Desk

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?

Aprna

मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीतच

swarit
देश / विदेश

Tarun Sagar Died | राष्ट्रसंत तरुण सागर यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk

नवी दिल्ली| जैन मुनी तरुण सागर यांचे आज वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना श्रद्धांजली वहात आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार निधनापुर्वी काही दिवस त्यांनी अन्नत्याग केला होता.

जैन मुनी तरुण सागर यांच्या विषयी थोडक्यात

  • देशात खूप कमी लोकांना हे माहित आहे की राष्ट्रसंत तरुण सागर यांचे मुळ नाव पवन कुमार जैन असे होते.
  • तरुण सागर यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव श्रीमती शांतीबाई जैन आणि वडीलांचे नाव प्रतापचंद्र जैन असे होते.
  • असे म्हटले जाते की वयाच्या १४ व्या वर्षी ते घर सोडून निघून गेले. ८ मार्च १९८१ रोजी त्यांनी घर सोडले गेले व सन्यास जीवन स्वीकारले. त्यांचे शिक्षण छत्तीसगडमध्ये झाले. त्यांच्या प्रवचनाचे सर्वत्र कौतुक केले जात असे. त्यांच्या प्रवचनांमुळे त्यांना ‘क्रांतिकारी संत’ हा सन्मान मिळाला आहे.
  • ६ फेब्रुवारी २००२ ला मध्य प्रदेश सरकार कडून त्यांना ‘राजकीय अतिथि’चा दर्जा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर २ मार्च २००३ ला गुजरात सरकारने देखील त्यांना ‘राजकीय अतिथि’ म्हणून सन्मानित केले होते. ‘तरुण सागर’ यांनी ‘कड़वे प्रवचन’ या नावाने एक बुक सीरीज सुरू केली होती. त्यामुळे ते सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.
  • त्यांच्या प्रवचनांना कडवट प्रवचन असे म्हटले जात असे कारण सामान्य जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल भाष्य करणारे प्रवचन ते देत असत. केवळ जैन धर्मातच नव्हे तर इतर समाजामध्येही त्यांच्या शिष्यांची संख्या लक्षणीय आहे.
  • २० जुलै १९९८ मध्ये राजस्थानच्या बागीडोरा येथे वयाच्या २० व्या वर्षी त्यांचे गुरु पुष्पदंत सागर यांनी त्यांना दिगंबर हे पद बहाल केले.
  • टीव्ही कार्यक्रम महावीर वाणी मधून ते अनेक लोकांपर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली.
  • नेहमीच हिंसा आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविणारे तरुण सागर हे राजकीय नेत्यांशी देखील संबधित होते. जेथे इतर जैन मुनी राजकारणापासून दूर राहतात तर दुसरीकडे तरुण सागर सरकारी अधिकारी आणि नेत्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून देखील उपस्थित रहात असत.
  • असे म्हटले जाते की लहानपणी त्यांनी गुरूवाणी ऐकली होती. ज्यामध्ये गुरुंनी त्याना म्हटले की आपण देखील ईश्वर होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर तरुण सागर यांनी कालांतराने आपले घर सोडले. ते घरी म्हणाले की, त्यांना आचार्यांसोबत जाण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत ते अन्न पाणी ग्रहण करणार नाहीत.
  • एकदा टीव्ही मुलाखतीत ते म्हणाले होते त्यांना जिलेबी प्रचंड आवडते. २९ जुलै २०१२ रोजी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना ‘तरुण क्रांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.

Related posts

दलित विद्यार्थ्याला लघवी प्यायला लावली

News Desk

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत जिल्हा सोडण्याचे आदेश

News Desk

एकहाती सत्तेचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील ! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

News Desk