HW News Marathi
मुंबई

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?

मुंबई | मंत्रालयामध्ये (mantralaya) एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात एका तरुणाने आज (17 नोव्हेंबर) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव जाळी लावल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव बापू नारायण मोकाशी (वय 43 वर्षे) असे आहे. हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे.

दरम्यान, या तरुणानी उडी मारल्यानंतर तो मंत्रालयाच्या जाळ्यावर होता. यावेळी त्या तरुणाने त्यांच्या मागण्या काय आहेत, असे विचारल्यावर आणि त्यांनी सांगितले. तर अथक प्रयत्नानंतर त्या तरुणाला खाली उतरविण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच मंत्रालयातील पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते. या तरुणाला पाहाण्यासाठी मंत्रालयात मोठी गर्दी जमली होती. मंत्रालयात आज राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक होती. यानिमित्ताने मंत्रालयात मोठी गर्दी उसळली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk

#26/11Attack : कसाबच्या कुकर्माची दशकपुर्ती

News Desk