मुंबई | म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९,०१८ घरांच्या लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे. ऑनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५,३२४ अर्जांतून या ९,०१८ घरांच्या लॉटरीची आज सोडत असणार आहे. म्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी १० च्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या लॉटरीचा शुभारंभ होणार आहे.
सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच निकाल जाणून घेता येईल. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लॉटरीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात येणार असून भवनात होणाऱ्या संगणकीय लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे याकरिता एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.