HW News Marathi
देश / विदेश

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले केरळ दौऱ्यावर

मुंबई | महापुरामुळे उन्मळून पडलेल्या केरळ राज्याला पुन्हा उभे करण्यासाठी संपूर्ण देशवासीयांनी केरळला सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. उध्वस्त झालेल्या या पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न असून त्यासाठी सर्व उद्योगपतींनी दानशूर व्यक्तींनी पुढे आले पाहिजे असे आवाहन करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रिपदाचे दोन महिन्यांचे वेतन धनादेशाच्या रूपाने केरळमधील मल्लपुरम जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या हाती सोपविला. तसेच खासदार निधीमधील काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीला देत असल्याचे केरळ च्या मल्लपुरम येथे रामदास आठवलेंनी जाहीर केले.

मंत्रिपदाच्या वेतनाचा दोन महिन्यांचा चार लाख रुपयांचा धनादेश केरळच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रामदास आठवलेंनी मल्लपुरम जिल्हा अधिकाऱ्यांकडे जमा केला. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील तिरुर तालुक्यातील नदी काठच्या थिपनगोंडू या गावात रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. या भागातील मदतका-याची पाहणी केली.

केरळच्या पुरग्रस्तांच्या मदतकार्याच्या पाहणीचा आढावा घेण्यासाठी ना रामदास आठवले हे दोन दिवस केरळ दौऱ्यावर असून त्यांनी मल्लपुरम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांचा ते दौरा करीत आहेत. या दौऱ्यावेळी रामदास आठवले यांच्या समवेत पी शशी कुमार आणि निलेश कुमार, अजय कुमार आदी रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.

केरळला आलेला महापूर हे प्रचंड मोठे नैसर्गिक संकट असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशवासीयांनी केरळच्या पूरग्रस्तांना आर्थिकसह सर्वप्रकारची मदत करावी. असे आवाहन करून देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक आणि जीवनोपयोगी वस्तूंची मदत केरळच्या पूरग्रस्तांसाठी करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

केंद्र सरकार ने आणि महाराष्ट्र्र शासनाने केरळच्या पूरग्रस्तांना वेळीच आर्थिक मदत पुरविली .तसेच बचाव पथकांतील शूर अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावून पूरग्रस्तांना वाचविले आहे. मात्र या भीषण महापुरात केरळ मधील अनेकांचा बळी गेला आहे. केरळ ला महापूर आल्यानंतर रामदास आठवले यांनी केरळवरील नैसर्गिक संकटाची भीषणता ओळखून सर्वप्रथम केरळच्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन 13 ऑगस्ट रोजी केले होते. आज दि. 24 ऑगस्ट रोजी रामदास आठवले केरळ दौऱ्यावर असून मल्लपुरम आणि एर्नाकुलम या भागातील पूरग्रस्तांच्या मदत कार्याचा आढावा घेऊन दि 25 ऑगस्ट रोजी दुपारी ते मुंबईत परतणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाराणसीतील मॉलमध्ये गोळीबार

Gauri Tilekar

ठरलं! तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार पदाची शपथ

News Desk

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk