HW News Marathi
देश / विदेश

Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

मुंबई | आज देशभरात ७२ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुगलने देखील एक खास डुडल साकारत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.भारतातील ट्रकवर करण्यात येणारी कलात्मक सजावट पाहण्यासारखी असते. त्याचाच आधार घेत गुगलनं हे डुडल साकारले आहे. गुगलने या डुडलमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ आणि आशियातील हत्तींसोबत रंगीत फूल आणि उगवता सूर्य दाखवला आहे.

गुगलने अनोखे रंगतदार डुडल तयार करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ३२,८७,७८२ चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला आपला देश रस्त्यांनी जोडला गेला आहे. या रस्त्यांवर लांबच्या दौवऱ्यावर आपल्या घरापासून दूर असलेले ट्रक चालक आपला ट्रक घराप्रमाणं सजवतात आणि आपली परंपरा जपतात. अनेकदा हे ‘ट्रक आर्ट’ सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती?

News Desk

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk