HW News Marathi
मुंबई

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

मुंबई | मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना पोलिसांनी अटक केले आहे. स्वच्छ भारत अभियाना आणि मनपाचे कंत्राटदार स्वप्नील दाते यांना मारहाण केल्या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्वप्नील दाते यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कुर्ला येथील शौचालय बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे, नगरसेवक संजय तुर्डे आणि कंत्राटदार स्वप्नील दाते या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. कुर्ला पोलीस ठाण्यात दाते यांनी तुर्डे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री तुर्डे यांना अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती

swarit

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी अटक

News Desk